‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज!
‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज!
मुंबई - भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, ‘राजा शिवाजी’ या द्विभाषिक (मराठी आणि हिंदी) चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आज शिवाजी जयंती दिनी प्रदर्शित करण्यात आले. इतिहास साक्षी आहे त्या अढळ निष्ठेचा आणि अजेय शौर्याचा. एक अशी गाथा, जी केवळ कथा नाही तर आहे ‘एक वचन, एक स्वराज्य, एक संपूर्ण राष्ट्राचा अभिमान’.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये अभिनेते-दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात अत्यंत प्रभावशाली दिसत आहेत. त्यांच्या हातात फडकणारा भगवा ध्वज, चेहऱ्यावरील करारी भाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व महाराजांच्या शौर्याची प्रचिती देते. पोस्टरमधील सुवर्ण अक्षरातील चित्रपटाचे नाव आणि तेजस्वी प्रकाशयोजना या ऐतिहासिक गाथेच्या भव्यतेची साक्ष देते.
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित “राजा शिवाजी” हा भव्य ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि दूरदृष्टीला मनःपूर्वक वंदन करणारी सिनेमॅटिक कलाकृती आहे. अन्यायाच्या अंधाराला छेद देत स्वराज्याच्या प्रकाशासाठी झुंज देणाऱ्या राजाच्या या अद्वितीय प्रवासाचे सशक्त चित्रण या चित्रपटातून साकारले आहे.
या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भक्कम फौज एकत्र पहायला मिळणार आहे. सिनेमाच्या संगीतात भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीत सम्राट अजय–अतुल यांची जादू अनुभवायला मिळणार असून, प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष सिवन या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. यामुळे “राजा शिवाजी” हा चित्रपट फक्त इतिहासाची कथा नसून, उत्कृष्ट अभिनय, भव्य दृश्यात्मक मांडणी आणि सांस्कृतिक गौरवाचा जागतिक स्तरावरील सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट, पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या स्वराज्यविचारांचा उत्सव ठरणार आहे.
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, मुंबई फिल्म कंपनी निर्मित, निर्माते ज्योती देशपांडे आणि जिनिलीया रितेश देशमुख, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित, द्विभाषिक (मराठी आणि हिंदी) चित्रपट ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ रोजी म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’च्या दिवशी जगभरातील चित्रपट गृहांत प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने शिवरायांच्या पराक्रमाची गाथा अंतरराष्ट्रीय पातळीवर ही विस्तारित होण्यास सज्ज.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant