स्त्री 2 चित्रपटानंतर जगभरात श्रद्धा कपूरचीच जादू
स्त्री 2 चित्रपटानंतर जगभरात श्रद्धा कपूरचीच जादू, फॉलोअर्सच्या बाबतीत रचला नवा विक्रम
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनय कौशल्य दाखवत तिने चाहत्यांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा तिचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहे. स्त्री 2 चित्रपटामुळे श्रद्धा कपूरच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. श्रद्धा कपूरने अभिनेत्री प्रियांका चोप्राला मागे टाकत सोशल मीडियावर नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रद्धा कपूर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली भारतीय अभिनेत्री बनली आहे.
स्त्री 2 चित्रपटानंतर जगभरात श्रद्धा कपूरचीच जादू
अभिनेत्री श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग (Instagram Followers) आहे. स्त्री 2 चित्रपटाच्या (Stree 2) यशानंतर या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत श्रद्धा कपूरने प्रियंका चोप्राला मागे टाकले आहे. याआधी प्रियांका चोप्रा ही इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली भारतीय अभिनेत्री होती, मात्र आता श्रद्धा कपूरने तिला मागे टाकत सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री बनली आहे. श्रद्धा कपूरने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकलं आणि आता प्रियंका चोप्रालाही मागे टाकलं आहे. इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत आता फक्त विराट कोहलीच श्रद्धा कपूरच्या पुढे आहे, पण त्याला मागे टाकणं सध्यातरी तिच्यासाठी अशक्य आहे.
श्रद्धा कपूरने प्रियंका चोप्राला टाकलं मागे
एकीकडे श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे ती भारतात इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री बनली आहे. अलीकडेच श्रद्धा कपूरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्याबाबतीत मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला होता. आता तिने ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रालाही मागे टाकलं आहे. श्रद्धा आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो होणारी दुसरी भारतीय सेलिब्रिटी बनली आहे. तर 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आता तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
फॉलोअर्सच्या बाबतीत रचला नवा विक्रम
'स्त्री 2'च्या यशानंतर श्रद्धा कपूरच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. आता त्याचे इंस्टा वर 91.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर प्रियांका चोप्राचे सध्याचे इंस्टा फॉलोअर्स 91.8 मिलियन आहेत. श्रद्धा कपूर आणि प्रियांका चोप्रानंतर आलिया भट्टचे सर्वाधिक 85.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, दीपिका पदुकोणचे सध्या 79.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय अभिनेत्रींच्या यादीत श्रद्धा कपूर पहिल्या क्रमांकावर आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant