मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक

पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक

अबुधाबी - पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान (Rahat Fateh ali khan) यांस दुबईतील विमानतळावरुन अटक करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियातून समोर आले होते.. दुबईतील बुर्ज दुबई पोलीस (dubai) स्टेशनमध्ये राहत फतेह अली खान यांच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती. मॅनेजर सलमान अहमद यांच्या तक्रारीनंतर दुबई पोलिसांनी (Police) ही अटकेची कारवाई केल्याचंही या वृत्तामध्ये म्हटलं होतं. मात्र, माझ्या अटकेचं वृत्त खोडसाळपणा असून निराधार असल्याचं स्वत: राहत फतह अली खान यांनी व्हिडिओच्या माध्यमातून थेट दुबईतून सांगितलं आहे.

दुबईतील एका कॉन्सर्टवरुन गायक राहत फतह अली खान आणि त्यांचा मॅनेजर अहमद सलमान यांच्यामध्ये एका शो संदर्भाने वाद झाला होता. शोचे आयोजन आणि आर्थिक देवाण-घेवाणीवरुन दोघांमधील हा वाद पोलिसांत गेल्यानंतर आता पाकिस्तानी गायकावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे दुबईतील शो केल्यानंतर परतत असताना दुबई पोलिसांनी थेट विमानतळावरुनच गायकास अटक केल्याचंही सोशल मीडियात म्हटलं होतं. मात्र, आता या सगळ्या वृत्तांना निराधार ठरवत स्वत: राहत फतह अली खान यांनीच सत्य सांगितलं आहे.

मी राहत फतह अली खान, तुमचा राहत फतह अली खान आहे. सध्या मी दुबईत गाणे रेकॉर्ड करण्यासाठी आलोय. सर्वकाही ठीक आहे, कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका, खोट्या बातम्यांवर लक्ष ठेऊ नका, असे म्हणत अटक झाल्याचे वृत्त पाकिस्तानी गायक खान यांनी फेटाळले आहे. तसेच, माझे शत्रू जे विचार करत आहेत, तसं काहीही नाही. लवकरच शोच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येईल. त्यावेळी, माझ्या सुपरहीट गाण्यांना तुम्हीही मोठी दाद द्याल. कारण, तुम्हीच माझी ताकद आहात, माझे चाहते, फॅन्स हीच माझी शक्ती आहे, असेही राहत फतह अली खान यांनी ट्विट करुन व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट