म्हणून नाव ठेवलं बॉर्डर
आपल्या आजूबाजूला अनेक अश्या गोष्टी होत राहतात ज्याचा आपल्याला अंदाजा नसतो. अशीच एक गोष्टी भारत पाकिस्तानच्या अटारी बॉर्डर वर घडली आहे. इंडिया - टुडे च्या रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका स्त्रीने तिच्या बाळाला अटारी बॉर्डर वर जन्म दिल्या मुळे तिने तिच्या नवजात शिशूचे नाव बॉर्डर असे ठेवले.
पंजाबमधील रानपूर जिल्ह्यात राहणाऱ्या निंबू बाई आणि बलम राम हे इतर ९७ पाकिस्तानी नागरिकांसोबत अटारी बॉर्डर वर राहत होते. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले कि निंबू बाईला प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतर तेथे वास्तव्य करणाऱ्या काही स्त्रीया तिच्या मदतीला गेल्या आणि तिकडेच निंबू बाईने नवजात शिशुला जन्म दिला, अटारी बॉर्डरवरच हे नवजात शिशु जन्माला आल्यामुळे त्याचे नाव बॉर्डर ठेवण्यात आले. या आधी सुद्धा असच एक प्रकार घडला होता अलास्का येथे एका बाईने तिच्या बाळाला विमानात जन्म दिल्यामुळे त्या बाळाचे नाव स्काय ठेवण्यात आले होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant