उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
मुंबई-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा माजी राज्यमंत्री डॉ. आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री जैन धार्मिक शिक्षण संघाचे उपाध्यक्ष संजय शाह यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिकमार्गदर्शक मिळवणे
या भेटीदरम्यान जैन समाजाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह प्रस्तावित जैन शिक्षण संकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, तसेच समाजहिताशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, मुंबईचे उपाध्यक्ष संजय जीवनलाल शाह, जैन अल्पसंख्यक सेवा संस्थेच्या महिला अध्यक्षा अल्पा शाह, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा ‘लंडन हेराल्ड’च्या भारत आवृत्तीचे प्रमुख राजेश उपाध्याय, युवा समाजसेवक पंकज उपाध्याय यांच्यासह जैन समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने जैन समाजाच्या माध्यमातून शिक्षण, संस्कार, सामाजिक सेवा आणि युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली.
यावेळी संजय शाह यांनी प्रस्तावित जैन शिक्षण संकुलाची संकल्पना उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजित पवार यांच्यासमोर मांडली. या संकुलामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आधुनिक सुविधांनी युक्त मोठ्या वसतिगृहाची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून, जैन धर्माची मूल्ये, भगवान महावीरांचा अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि करुणेचा संदेश तसेच आधुनिक उच्च शिक्षण यांचा समन्वय साधून नव्या पिढीला गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
“जैन शिक्षण संकुल हे केवळ एक वास्तू नसून जैन संस्कृती, संस्कार आणि ज्ञानपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे एक प्रभावी माध्यम ठरेल. या संकुलातून शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून देश-विदेशात भारताचे आणि जैन समाजाचे नाव उज्ज्वल करतील. तसेच भगवान महावीरांचा अहिंसा व शांततेचा संदेश जगभर पोहोचविण्यासाठी योगदान देतील,” असे संजय शाह यांनी सांगितले.
जैन समाजाचा मुंबई, महाराष्ट्र तसेच देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात दीर्घकाळापासून महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. समाजातील उद्योजक, युवा तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले नागरिक राष्ट्रनिर्माणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देत असल्याचेही शिष्टमंडळाने नमूद केले. स्थानिकमार्गदर्शक मिळवणे
उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजित पवार यांनी जैन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. प्रस्तावित जैन शिक्षण संकुलासह समाजाच्या विविध सकारात्मक उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य आणि सकारात्मक मार्गदर्शन देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, शिष्टमंडळाने आगामी सामाजिक व सन्मान सोहळ्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांना दिली. या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नारीशक्ती तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गरजू महिलांना शिवणयंत्रांचे वितरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शिक्षण, संस्कार, महिला सक्षमीकरण, सामाजिक सेवा आणि राष्ट्रनिर्माण या माध्यमातून जैन समाज पुढील पिढीला अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. भगवान महावीरांचा ‘अहिंसा परमो धर्मः’ हा संदेश व्यापक स्तरावर जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठीही समाजाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर