MPSC पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
पुणे- : MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांनी नंदुरबारमधून ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने झाडाझडतीनंतर ज्ञानदीप सोसायटीतील तिच्या घरातून ही कारवाई केली. या अटकेमुळे औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे. ऋतुजा पाटील हिला नंदुरबारातील ज्ञानदीप सोसायटीमधील तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांचे विशेष गुन्हे शाखेचे पथक आज सकाळपासून नंदुरबारमध्ये दाखल झालं होतं. पोलिसांच्या पथकाने नंदुरबारातील विविध ठिकाणी झाडाझडती घेत चौकशी केली. त्यानंतर अखेर ऋतुजा पाटील हिला तिच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतल्यानंतर ऋतुजा पाटील हिला मुंबईतील विशेष गुन्हे शाखेच्या पथकाकडून मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे. पेपर खरेदी केल्याचा आणि नंतर तो प्रियकराला दिल्याचा आरोप ऋतुजा पाटील हिच्यावर आहे. आता ऋतुजाच्या ताब्यामुळे औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या बिनसलेल्या प्रेमप्रकणामुळेच हा पेपरफुटीचा प्रकार उघड झाला. ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेतली होती. ऋतुजाच्या हातात तो पेपर आल्यावर तिने प्रेमापोटी तो पेपर गौरव पाटील यालाही दिला. मात्र त्यांचं ब्रेकअप झाल्यावर गौरव पाटील यानेच MPSCकडे तक्रार दाखल केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांचाही समावेश आहे. तसेच सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात परीक्षार्थी ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. तर आता ऋतुजा हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या प्रकरणात प्रेमाचा अँगल समोर आणला जात असला तरी, तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे याने पोलिसांवर ‘चोर सोडून संन्यासाला पकडल्याचा’ आरोप केला आहे. ज्या गौरव पाटीलने आपल्यासोबत तुकाराम मुंढे आणि आयोगातील अधिकारी लेंडवे यांची भेट घेऊन या गैरप्रकाराची तक्रार दिली, तोच आरोपी कसा असू शकतो, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. तसेच, अधिकारी लेंडवे हाच या पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचा दावाही त्याने केला आहे.
या प्रकरणातील आरोपी अमृत पाटील हे नंदुरबार येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून, त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी MPSC च्या तीन अधिकाऱ्यांशी तब्बल 12 लाख रुपयांत पेपर खरेदीचा सौदा केला आणि त्यापैकी 5 लाख रुपये अधिकाऱ्यांना दिले होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant