पायाभूत सुविधांच्या अनागोंदीमुळे चाकणमधील २० कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा
पायाभूत सुविधांच्या अनागोंदीमुळे चाकणमधील २० कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा
पुणे-: पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमधील २० लघुउद्योगांनी खराब रस्ते, खड्डे, वीज-पाण्याची टंचाई आणि प्रचंड वाहतूक कोंडीला कंटाळून साताऱ्याच्या खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतर करण्याचा तीव्र इशारा दिला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, औद्योगिक मंत्री उदय सामंत यांनी कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढण्याची ग्वाही दिली. आता मुख्यमंत्री फडणवीस चाकणच्या कंपन्यांसाठी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. चाकण MIDC तील वीस लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर चाकणच्या विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. चाकण महानगरपालिका किंवा इंडस्ट्रियल टाऊनशिप स्थापनेच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
प्रस्तावित आराखड्यात चाकणसह राजगुरूनगर, आळंदी आणि परिसरातील सुमारे ५० गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वीही अशा घोषणा झाल्याने ग्रामस्थ सध्या सावध भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतल्यास चाकणच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.
चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचे केंद्र असून, येथील उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे याला आमचे प्राधान्य आहे. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून, संबंधित सर्व घटकांशी संवाद साधून ठोस निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर