जगप्रसिद्ध IT कंपनी एकाचवेळी काढणार १० हजार कर्मचारी
जगप्रसिद्ध IT कंपनी एकाचवेळी काढणार १० हजार कर्मचारी
न्यूयॉर्क-: जगातील सर्वात मोठ्या IT कंपनीने पुन्हा एकदा कर्माचारी कपातीची घोषणा केली आहे. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरॅकल जगभरातील अंदाजे 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. कंपनीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. भारतात असललेले कर्मचारी डेंजर झोनमध्ये असल्याचेही समजते. 1 सप्टेंबर रोजी कर्मचारी कपातीची घोषणा होण्याची अपेक्षा वर्तवली जात होती, परंतु आता 15 सप्टेंबर ही पुढील संभाव्य तारीख म्हणून विचारात घेतली जात आहे. याचा अर्थ कंपनी लवकरच आपला निर्णय जाहीर करू शकते.
ओरॅकल कंपनीच्या कर्माचरी कपातीचा सर्वाधिक परिणाम भारतातील कर्मचाऱ्यांवरही होण्याची शक्यता आहे. क्लाउड आणि एआय पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च भरून काढण्यासाठी तसेच एकूण खर्च कमी करण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.
या संभाव्य कर्मचारी कपाताचा सर्वात मोठा फटका ओरॅकलच्या भारतीय कर्मचाऱ्यांना बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतातील कार्यालय हे ओरॅकलच्या जागतिक कामकाजाचे एक प्रमुख आणि महत्त्वाचे केंद्र आहे. इंजिनिअरिंग, क्लाउड सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी आणि सपोर्ट यांसारख्या कंपनीच्या सर्वात मोठ्या टीम्स येथेच आहेत. त्यामुळे, जागतिक स्तरावरील कपातीचा एक मोठा भाग भारतीय कर्मचाऱ्यांवर परिणाम करू शकतो.
ओरॅकल कंपनीच्या व्यवस्थापनाने आपल्या विविध टीमच्या प्रमुखांना खर्च कमी करण्याचे मार्ग शोधण्यास सांगितले आहे. या अनुषंगाने कोणत्या विभागातील कर्माचऱ्यांची संख्या कमी होऊ शकते याचा आढावा घेत अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा अर्थ कंपनीच्या सर्वच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या नोकर कपातीचा सामना करावा लागणार आहे. कुणाची नोकरी जाईल कागी सांगता येत नाही. यामुळे सर्वच कर्मतरी नोकरी जाण्याच्या भितीमुळे दहशतीत आहेत. कंपनीमधील अंतर्गत चर्चेनुसार, या कर्मचारी कपातीचा परिणाम जगभरातील 7,000 ते 10,000 कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप ओरॅकल कंपनीने कर्मचारी कपातीचा निश्चित आकडा जाहीर केलेला नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर