लायन्स क्लब बॉम्बे, गोकुधाम – यशोधाम चा मेगा मेडिकल कॅम्प उत्साहात संपन्न!
लायन्स क्लब बॉम्बे, गोकुधाम – यशोधाम चा मेगा मेडिकल कॅम्प उत्साहात संपन्न!
मुंबई-: गोरेगाव (पूर्व) येथील, विसावा ज्येष्ठ नागरिक संघ, नागरी निवारा येथे वर्षातील दूसरे वैद्यकीय शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन प्रथम उपजिल्हा राज्यपाल (1st VDG) लायन विकास सराफ यांच्या हस्ते झाले. शिबिरात डॉ. गायत्री पांडव (डीसी डायबेटीस), डॉ. उमेश जोशी (जीएफए ह्युमॅनिटेरियन), डॉ. किशोर पांडव आणि अध्यक्ष – सुबोध गोखले हे उपस्थित होते.
शिबिरामध्ये रक्तातील साखरेची तपासणी, बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजणी, रक्तदाब तपासणी तसेच स्तन कर्करोग तपासणी दंत चिकित्सा, नेत्र तपासणी हेयर आणि स्किन तपासणी अशा मोफत निदान सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ५० हून अधिक नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतला. त्यामध्ये २५ महिलांनी स्तन कर्करोग तपासणी करून घेतली.
इंडियन डेंटल असोसिएशन चे अध्यक्ष – डॉ. विरज संघवी, सह डॉ. जगमीत देसाई, डॉ. रेयांश पावसकर, डॉ. पूनम चौधरी, व डॉ. खुशबू दोशी यांनी दंत चिकित्सा ची माहिती देऊन तपासणी केली.
लायन सदस्य – संगीता भुतानी, ज्योती कुलकर्णी, वंदना मनचंदा राव, विकास पातोळे, डॉ अनुप्रिता पेडणेकर, एस जी गुप्ता यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
विशेष ज्येष्ठ समाजसेवक – संदीप राजपुरकर, ज्येष्ठ पत्रकार – बाळ पंडित व विसावा ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष – शैलजा बोन्द्रे, सचिव – रमेश शेलार, रोहिदास बुधिवंत, संतोष गावडे, चंद्रज्योती कांबळे संतोष गावंडे व रघुनाथ चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर