अमित ठाकरेंच्या आक्षेपामुळे मनसे कार्यकर्त्यांनी मोदींचे छायाचित्र हटविले
अमित ठाकरेंच्या आक्षेपामुळे मनसे कार्यकर्त्यांनी मोदींचे छायाचित्र हटविले
पुणे -: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील एका पॉलिटेक्निक अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेस आणि वसतिगृहाची पाहणी केली. या वेळी महाविद्यालयाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर अमित ठाकरे यांनी आक्षेप घेत प्राचार्यांकडे याबाबत विचारणा केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र का लावण्यात आले आहे?’ असा सवाल अमित ठाकरे यांनी केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र तेथून हटविले. स्थानिकमार्गदर्शक मिळवणे
अमित ठाकरे यांनी पाहणीदरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत मेस आणि वसतिगृहातील सुविधांची माहिती घेतली. या घटनेनंतर महाविद्यालयाच्या कार्यालयातील छायाचित्रांचा मुद्दा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, या प्रकारावर भारतीय जनता पक्षाकडून मनसेवर टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यामागे असलेल्या प्रोटोकॉलचा दाखला देत भाजपने मनसेला ‘प्रोटोकॉलची आठवण’ करून दिली. तसेच मनसेकडून खालच्या पातळीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यामुळे छायाचित्र हटविण्याच्या या घटनेवरून मनसे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, पुण्यातील राजकीय वातावरणात या घटनेची चर्चा रंगली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant