पैठणीवर येणार बारकोड – बनावट विक्रीला बसणार चाप
पैठणीवर येणार बारकोड – बनावट विक्रीला बसणार चाप
मुंबई-: महाराष्ट्राची शान असलेली येवल्याची ओरिजनल पैठणी साडी घेणं हे प्रत्येक मराठी स्त्रीचं स्वप्न असतं. बाजारात पैठणीच्या किंमती लाखांच्या घरात आहे. बाजारात ओरिजनल पैठणीच्या ऐवजी सेमी पैठणी किंवा डुप्लीकेट पैठणीदेखील विकली जाते. मात्र आता बनावट पैठणीच्या विक्रीला चाप बसणार आहे. ग्राहकांना आता सेमी पैठणी आणि ओरिजनल पैठणीतील फरक स्पष्ट होणार आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्यासाठी मोठा निर्णय घेतला असून ग्राहकांना दोन्हीतील फरक समजून पैठणी खरेदीपासून त्यांची होणारी फसवणूक टळणार आहे. राज्याचे स्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे महत्त्वाची माहिती दिली आहे. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता सावकारे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे. शब्दकोशसंदर्भ शोधणे
ग्राहकांना खरी पैठणी ओळखता यावी त्यासाठी एक बारकोड आणि लोगो बनवण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. खऱ्या पैठणीची ओळख होण्यासाठी बारकोडच्या माध्यमातून कोणता धागा वापरलाय कोणत्या गावात कोणत्या कारागिरांना ही पैठणी तयार केलेले याची माहिती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बनावट पैठणी ओळखता येणार आहे.
पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे पैठणीला मागणी खूप आहे. तो एक कलेचा भाग आहे. एक पैठणी तयार करायला 15 ते 30 दिवस एवढा कालावधी कारागिरांना लागतो. पैठणीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. पैठणी विक्रीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शन भरवत असतो त्यामधून सुद्धा पैठणी खरेदीसाठी चांगली मागणी आहे, असं संजय सावकारे यांनी म्हटलं आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade