मुंबई महानगर क्षेत्रात उद्यापासून टॅक्सी व ऑटोरिक्षांच्या भाडेदरात वाढ
मुंबई महानगर क्षेत्रात उद्यापासून टॅक्सी व ऑटोरिक्षांच्या भाडेदरात वाढ
मुंबई -: मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रातील सीएनजी चालित काळी-पिवळी मीटर टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाडेदरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६८ अन्वये गठित या प्राधिकरणाची बैठक २० ऑगस्ट २०२६ रोजी अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
वाहनांच्या सरासरी किंमतीत, ग्राहक निर्देशांकात आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात झालेली वाढ लक्षात घेता, शासन निर्णय दिनांक ९ मार्च २०२० द्वारे स्वीकृत खटुआ समितीच्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आली आहे.
सुधारित भाडेदरांचा तपशील
काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) : किमान देय भाडे (पहिले १.५ किलोमीटरसाठी): रुपये ३१/- वरून वाढवून रुपये ३३/-. पुढील प्रतिकिलोमीटर भाडे: रुपये २०.६६/- वरून वाढवून रुपये २१.९०/-
ऑटोरिक्षा (सीएनजी) : किमान देय भाडे (पहिले १.५ किलोमीटरसाठी): रुपये २६/- वरून वाढवून रुपये २७/-. पुढील प्रतिकिलोमीटर भाडे : रुपये १७.१४/- वरून वाढवून रुपये १८.२२/-
अंमलबजावणी व अटी :- ही भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व सीएनजी काळी-पिवळी मीटर टॅक्सी व ऑटोरिक्षांना लागू राहील. उपरोक्त भाडेदर सुधारणा दिनांक ०१/०९/२०२६ पासून अमलात येईल. सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे (Meter) रिकॅलीब्रेशन करून घेणे बंधनकारक असून, जे परवानाधारक रिकॅलीब्रेशन करून घेतील, केवळ त्याच ऑटोरिक्षा व टॅक्सींना ही भाडेवाढ लागू होईल. भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन दिनांक ०१/०९/२०२६ ते दिनांक ३०/११/२०२६ या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant