माजी सरसरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर रशियाकडून मोठी जबाबदारी
माजी सरसरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर रशियाकडून मोठी जबाबदारी
मॉस्को-: भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची रशिया-युक्रेन वादाशी संबंधित एका मोठ्या आंतरराष्ट्रीय आर्बिट्रेशन केसमध्ये एन्ट्री झाली आहे. युक्रेनची सरकारी बँक ओशचाडकडून गुंतवणूक वाद प्रकरणात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात रशियाची बाजू मांडण्यासाठी चंद्रचूड यांची नियुक्ती झाली आहे. रशियाच्या विरोधात युक्रेनच्या सरकारी बँकेनं शेकडो मिलियन डॉलरचा दावा दाखल केला आहे.
हा वाद रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या १९९८ मध्ये झालेल्या द्विपक्षीय गुंतवणूक समझोत्याच्या अंतर्गत सुरू असलेल्या आर्बिट्रेशन कार्यवाहीशी संबंधित आहे. ओशचाड बँकेचा दावा युक्रेनच्या डोनेत्स्क, लुहांस्क, खेरसॉन आणि जापोरिज्जिया परिसरातील आपल्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांमध्ये झालेल्या कथित नुकसानाशी संबंधित आहे. २०२२ मध्ये रशियानं हाती घेतलेल्या लष्करी मोहिमेमुळे या मालमत्तांचं आणि व्यवसायाचं नुकसान झाल्याचा बँकेचा दावा आहे.
या प्रकरणाची सुनावणी तीन सदस्यीय आर्बिट्रेशन ट्रिब्युनल करेल. कोस्टा रिकाच्या आर्बिट्रेटर आणि माजी व्यापार मंत्री डायाला जिमेनेज यांची रशिया आणि ओशचाड बँकेनं संयुक्तपणे लवादाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. तर ग्रीसचे आर्बिट्रेटर आणि नॅशनल सिक्युरिटी ऑफ सिंगापूरचे प्रोफेसर स्टावरोस ब्रेकॉलाकिस यांची नियुक्ती ओशचाड बँकेकडून करण्यात आली आहे. तर रशियानं भारताचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade