प्लॅस्टीक नोटांना केंद्र सरकारची मंजूरी – प्रायोगिक तत्त्वावर होणार चाचणी
प्लॅस्टीक नोटांना केंद्र सरकारची मंजूरी – प्रायोगिक तत्त्वावर होणार चाचणी
नवी दिल्ली-: केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या पॉलिमर नोटांच्या फिल्ड ट्रायलला (प्रायोगिक चाचणीला) हिरवा कंदील दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात म्हटले की, ‘सरकारने आरबीआयच्या प्रस्तावानुसार पॉलिमर बँक नोटांना मंजूरी दिली आहे.’
RBI कायद्याच्या कलम २५ अंतर्गत सादर केलेल्या प्रस्तावानुसार, भारतात लवकरच १० रुपये आणि २० रुपयांच्या प्रत्येकी १ अब्ज (१०० कोटी) पॉलिमर नोटा बाजारात आणल्या जातील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मूल्याच्या (१० रुपये आणि २० रुपये) नोटांचा व्यवहारात वापर अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे त्यांची वयोमर्यादा खूप कमी असते. नवीन नोटांमुळे या मर्यादेवर मात करता येईल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या चलनात असलेल्या कागदी नोटा लगेच बंद होणार नाहीत. पॉलिमर नोटा आणि कागदी नोटा या दोन्हीही कायदेशीर चलन म्हणून बाजारात एकाच वेळी सुरू राहतील. या प्रायोगिक चाचणीचे निकाल यशस्वी झाल्यानंतरच या नोटांच्या नियमित छपाईबाबत आणि प्रसाराबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
जगातील अनेक देशांमध्ये गेल्या ३० वर्षांपासून पॉलिमर नोटा वापरात आहेत. त्यांचा अनुभव असा आहे की, पॉलिमर नोटांचे आयुष्य नेहमीच्या कागदी नोटांपेक्षा २ ते ४ पटीने जास्त असते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर