महाराष्ट्रातील शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी होणार मुंडण आंदोलन
महाराष्ट्रातील शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी होणार मुंडण आंदोलन
मुंबई-महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित महिला शिक्षिका, शिक्षक व त्यांच्या कुटुंबीय मुंडण आंदोलन करणार आहेत.
महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या, समस्या व अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने एकदिवसीय मुंडन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये महिला शिक्षिका, शिक्षक तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या गंभीर कौटुंबिक, सामाजिक व प्रशासकीय समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांना अनेक वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या व्यथा, मागण्या आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा परिणाम व्यापक जनतेसमोर तसेच शासनाच्या निदर्शनास आणून देणे हा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये नवीन भरतीपूर्वी आंतर जिल्हा बदलीचा सत्व टप्पा तात्काळ मार्गी लावणे. तसेच आंतरजिल्हा बदलीनंतर पूर्वीचे जिल्ह्यातील सेवा ग्राह्य धरणे. त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना एक वेतन वाढ लागू करावी. तसेच नगरपरिषद शिक्षकांचे वेतन शंभर टक्के राज्य शासनाने देण्यात यावे. त्याचप्रमाणे 15 मार्च 2012 24 चा पंचमान्यतेचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा. तसेच शिक्षक पदाचा परीक्षा घेऊन योग्य तो शिक्षकांना न्याय द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत. जोपर्यंत आमच्या ह्या मान्य मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाचे सुरू ठेवू अशी माहिती शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी संतोष विठ्ठलवाड आणि रवींद्र आंबोले यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant