मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याबद्दल Meta ला 4,700 कोटींचा दंड
मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याबद्दल Meta ला 4,700 कोटींचा दंड
मुंबई- : अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा कंपनी वर 567 दशलक्ष डॉलर्सचा (भारतीय चलनात सुमारे 4,700 कोटी ) प्रचंड दंड ठोठावला आहे. प्लॅटफॉर्मवरील व्यसनाधीन फीचर्समुळे अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. यापूर्वी मार्च महिन्यातच ज्युरींनी मेटाला दोषी ठरवून 375 दशलक्ष डॉलर्सचा दंड केला होता.
हा खटला न्यू मेक्सिकोचे ॲटर्नी जनरल राऊल टॉरेझ यांनी दाखल केला होता. कोर्टात सिद्ध झाले की, मेटाने जाणीवपूर्वक मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवणारे फीचर्स बदलले नाहीत आणि बाल लैंगिक शोषणासारख्या गंभीर बाबी लपवल्या. त्यामुळे कंपनीने ग्राहक आणि पालकांची दिशाभूल केली, असेही कोर्टाने नमूद केले.
दुसऱ्या टप्प्यात न्यायाधीश ब्रायन बीडशीड यांनी मेटाला “सार्वजनिक उपद्रव” (public nuisance) निर्माण केल्याबद्दल दोषी ठरवले. कंपनीने तयार केलेल्या अल्गोरिदम्समुळे मुलांमध्ये व्यसनाधीन वापर वाढला आणि त्यांना मानसिक धोक्यांचा सामना करावा लागला. यामुळेच अतिरिक्त 567 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला.
न्यायालयाने केवळ आर्थिक दंडच नाही तर पुढील 5 वर्षांसाठी कडक निर्बंधही लादले आहेत. यामध्ये रात्री 10 ते सकाळी 7 दरम्यान मुलांना पुश नोटिफिकेशन्स पाठवण्यास बंदी, महिन्याला कमाल 90 तास वापर मर्यादा, ‘लाईक्स’ची संख्या लपवणे आणि बाल शोषणाशी संबंधित तक्रारींवर वेगवान देखरेख ठेवणे यांचा समावेश आहे. मात्र, वय पडताळणी यंत्रणा बदलण्याचे थेट आदेश न्यायालयाने दिलेले नाहीत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर