सुकन्या समृद्धी योजना व एनपीएस वात्सल्यद्वारे दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेला बळ
सुकन्या समृद्धी योजना व एनपीएस वात्सल्यद्वारे दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेला बळ
मुंबई प्रतिनिधी- : आर्थिक समावेशन आणि मुलींच्या सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज घाटकोपर (पश्चिम) येथील एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्ट स्कूलमध्ये आयोजित “एम्पॉवरिंग हर फ्युचर १००० बेटियां, १००० सपने, एक विश्वास” या कार्यक्रमात १,००० वंचित मुलींचा सत्कार करण्यात आला.
समाजसेवक गौरव भंडारी यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत सुकन्या समृद्धी योजना आणि एनपीएस वात्सल्य योजना अंतर्गत १,००० सरकारी बचत खाती उघडण्यात आली. प्रत्येक मुलीच्या खात्यात गौरव भंडारी यांनी ₹२०,००० जमा केले असून, पुढील दहा वर्षे दरवर्षी तितकीच रक्कम जमा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी एकूण ₹२० कोटींची वैयक्तिक बांधिलकी जाहीर केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे “नव्या पर्वाची सुरुवात” असे वर्णन करत गौरव भंडारी यांच्या कार्याचे कौतुक केले. “गौरव हे केवळ त्यांचे नाव नाही, तर त्यांचे कार्यही खऱ्या अर्थाने गौरवास्पद आहे,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या भावनेशी सुसंगत असलेला हा उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी मुलींबाबत कोणताही भेदभाव होता कामा नये, असे स्पष्ट केले.
“आपण ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या विचारावर विश्वास ठेवणारे नाही. भारतीय संस्कृती सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची शिकवण देते. समाजात खरा मोठा तोच, जो इतरांना देतो. गौरवजी, हे समाजकार्य असेच सुरू ठेवा,” असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
यावेळी भाजप आमदार परिषद सदस्य श्री. प्रसाद लाड म्हणाले, “गौरवसारखे आणखी १०० जण पुढे आले आणि प्रत्येकाने १,००० मुलींची जबाबदारी स्वीकारली, तर हा उपक्रम आपण एनएससीआय डोममध्ये अधिक भव्य स्वरूपात साजरा करू.”
उपक्रमामागील प्रेरणा व्यक्त करताना गौरव भंडारी म्हणाले, “मला वंचित मुलींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवणारे काहीतरी करायचे होते. ही एकवेळची देणगी नसून त्यांच्या भविष्यासाठीची दीर्घकालीन बांधिलकी आहे. आपण कमावलेल्या संपत्तीपेक्षा समाजाला काय दिले, यासाठीच आपली ओळख कायम राहते.”
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व १,००० लाभार्थी मुलींना पासबुकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि बँक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील वंचित मुलींच्या आर्थिक सुरक्षिततेसह उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर