आजपासून ५ दिवस पूर्णवेळ ‘SIR’ ड्युटी
आजपासून ५ दिवस पूर्णवेळ ‘SIR’ ड्युटी
मुंबई-: मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (SIR) मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना २९ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान पूर्णवेळ मतदारयादीचे काम करावे लागणार आहे. मुंबईतील साडेनऊ हजारांहून अधिक शिक्षक ‘बीएलओ’ ड्युटीवर असल्याने अगोदरच अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यात आता पाच दिवस शिक्षक पूर्णवेळ उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होणार आहे. अनेक शाळांमधील ९० टक्क्यांहून अधिक शिक्षकांना बीएलओ ड्युटी लागली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच काही शाळांमधील वर्ग शिक्षकांविना ओस पडत आहेत. त्याचा परिणाम अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर होत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारयाद्यांचा एसआयआर कार्यक्रम जाहीर केला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील या कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांनी शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर ‘बीएलओ’चे काम करावे, अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. मात्र, कामाचा व्याप आणि उपलब्ध कालावधी लक्षात घेऊन शिक्षकांना आवश्यकतेनुसार कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant