या राज्यात ७ हजारांहून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह
या राज्यात ७ हजारांहून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह
बंगळुरू-: कर्नाटकात 18 ते 25 वयोगटातील तब्बल 7 हजार हून अधिक विद्यार्थी आणि तरुण HIV बाधित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर परिस्थितीची नोंद घेत कर्नाटक सरकारने आता थेट अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) आणि पदवी महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही तपासणी आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी, अनुदानित आणि खाजगी अशा सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये ही शिबिरे घेतली जाणार असली, तरी कोणत्याही विद्यार्थ्याची संमतीशिवाय तपासणी केली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
‘नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (NACO) 2024च्या अहवालानुसार भारतात एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत कर्नाटक राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकात सध्या सुमारे 2.60 लाख लोक एचआयव्हीसह जगत आहेत. परंतु त्यापैकी केवळ 2.05 लाख लोकच ‘अँटीरेट्रोव्हायरल थेरपी’ (ART) उपचार घेत आहेत. म्हणजेच आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार तब्बल 54 हजार लोकांना आपल्याला एचआयव्ही संसर्ग झाला असल्याची कल्पनाच नाही.
कर्नाटकच्या विश्वेश्वरैया तंत्रज्ञान विद्यापीठाने आपल्या सर्व संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या शिबिरांमध्ये एचआयव्ही तपासणी, जनजागृती आणि समुपदेशन यांसारख्या सेवा पुरवल्या जातील. विद्यार्थ्यांची गोपनीयता जपण्यासाठी KSAPS ने एक विशेष ‘क्यूआर कोड’ आधारित एचआयव्ही स्व-जोखीम मूल्यांकन टूल (HIV Self-Risk Assessment Tool) सुरू केले आहे. विद्यार्थी आपल्या मोबाईलवरून हा क्यूआर कोड स्कॅन करून स्वतःच्या वागणुकीच्या आणि संभाव्य धोक्याच्या आधारे एचआयव्ही संसर्गाची जोखीम गोपनीयतेने तपासू शकतात. या टूलद्वारे विद्यार्थ्यांना जवळच्या आरोग्य केंद्राची माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade