कल्याण जिल्हा कारागृहात २,७०० वृक्षांची लागवड; पोलीस, कारागृह कर्मचारी व बंदीजनांचा पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा पुढाकार

कल्याण- : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कल्याण येथील आधारवाडी जिल्हा कारागृहात पोलीस कर्मचारी, कारागृह कर्मचारी आणि बंदीजनांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. कारागृह परिसरात सुमारे ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी सामाजिक वनीकरण विभाग, बदलापूर यांच्याकडून २,७०० रोपे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली असून शेकडो रोपांची लागवड पूर्ण झाली आहे.
ही मोहीम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) डॉ. सुहास वारके यांच्या प्रेरणेने तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक व उपमहानिरीक्षक (दक्षिण विभाग) योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. कारागृह अधीक्षक एच. एस. मिंड यांच्या नेतृत्वाखाली कारागृह प्रशासनाने या पर्यावरणपूरक उपक्रमाला गती दिली आहे.
या वृक्षारोपण मोहिमेत बांबू, करंज, चिंच, काजू, आपटा, आवळा, कांचन, आंबा, जांभूळ आणि सोनचाफा आदी विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात येत आहे. कारागृह परिसरातील मोकळी जागा तसेच संरक्षक बांधावर टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण केले जात आहे.
कारागृह प्रशासनाचा उद्देश केवळ हरित वातावरण निर्माण करणे नसून, कारागृह परिसराभोवती नैसर्गिक हिरवी सुरक्षा भिंत उभी करणे हा देखील आहे. यामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे.
या मोहिमेत उपअधीक्षक यू. पी. पाटील, वरिष्ठ जेलर अभिजित एस. कोळी, जेलर आर. जी. वडले, पी. यू. खुस्तान, एस. एम. बाविस्कर, यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी आणि बंदीजनांनी श्रमदान करून सक्रिय सहभाग नोंदविला.
सामाजिक वनीकरण विभाग, बदलापूर यांनी उपलब्ध करून दिलेल्या २,७०० रोपांमध्ये ९०० बांबू, ५०० करंज, १०० चिंच, १०० काजू, ५०० आपटा, १०० आवळा आणि ५०० कांचन या रोपांचा समावेश आहे.
मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ७०० बांबू, १०० करंज, ३० चिंच आणि ५० आवळा या रोपांची लागवड पूर्ण झाली असून, उर्वरित रोपांची लागवड टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर