५ जिल्ह्यांतील २९ कॉलेजेसवर नवीन प्रवेशासाठी बंदी
५ जिल्ह्यांतील २९ कॉलेजेसवर नवीन प्रवेशासाठी बंदी
अमरावती-: शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत दिलेले कायदेशीर प्रतिज्ञापत्र आणि आश्वासन न पाळणाऱ्या २९ महाविद्यालयांवर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अखेर कारवाईचा आसूड ओढला आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी या सर्व संस्थांमध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. प्रवेशाबाबतची अधिकृत यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षातही (२०२५-२६) या संस्थांवर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी लवकरच आवश्यक पदभरती पूर्ण करू, असे कायदेशीर प्रतिज्ञापत्र महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे सादर केले होते. मात्र, वर्ष उलटूनही पदभरतीची प्रक्रिया कागदावरच राहिली. या नियमांच्या उल्लंघनामुळे विद्यापीठाने यंदाही ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. अधिक माहितीसाठी उपकुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा असेही म्हटले आहे.
जिल्हानिहाय प्रतिबंधित महाविद्यालयांची यादी
अमरावती
महाराष्ट्र कला (शिराळा)
स्व. पंचफुलाबाई भारसाकळे कला-वाणिज्य (सातेगाव)
श्रीराम कला, वाणिज्य व विज्ञान (मोर्शी)
मधुबन कला व वाणिज्य (धारणी)
डॉ. एस. एस. गोरडे विज्ञान (अचलपूर)
अकोला
गयादेवी जोशी आर्यभट
सौ. वैदेही विष्णू सराफ
गुलाम जैनुल आबोदिन कला (वाडेगाव)
मेघे इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज
श्री. व्ही. के. जोशी महाविद्यालय (गायगाव)
बुलढाणा
ग्रंथालय व माहितीशास्त्र
श्रीरामभाऊ शेळके विधी (खामगाव)
व्यवसाय प्रशासन
सत्यजित सायन्स (मेहकर)
स्व. गजानन गावंडे विज्ञान (खामगाव)
स्व. गणेश शिंगणे कला (देऊळगाव मही)
सरस्वती महाविद्यालय (शेगाव)
श्रीमती तुलसीबाई झांबड वरिष्ठ (नांदुरा)
श्री सरस्वती कला, वाणिज्य व विज्ञान (जानेफळ)
श्रीमती बसंतीबाई चांडक सहकार कला व वाणिज्य (डोंगरखंडाळा)
यवतमाळ
डॉ. बाबासाहेब नांदुरकर शारीरिक शिक्षण
स्व. रुपेशकुमार इंगोले कॉलेज ऑफ मॅनेजमेंट
अनिरुद्ध कॉलेज ऑफ सायन्स (कळंब)
श्रीमती सूर्यकांता तेलगोटे महिला
वसंतराव नाईक रात्रकालीन महाविद्यालय (पुसद)
वाशीम
आदर्श अध्यापक (कारंजा लाड)
सन्मती लॉ कॉलेज (वाशिम)
श्री कानीफनाथ (खेरडा)
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (जांभरून परांडे)
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant