भायखळ्यातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी जल्लोषात साजरी
भायखळ्यातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी जल्लोषात साजरी
मुंबई प्रतिनिधी-: भायखळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशीनिमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेतले. भायखळा येथील हे विठ्ठल रूखमाई चे मंदिर फार प्राचीन असून येथे मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात वर्षाच्या बाराही महिने भजन आणि कीर्तन सुरू असते. यावेळी अनेक दानशूर व्यक्ती आणि भाविकांच्या वतीने साबुदाणा खिचडी आणि केळी वाटप करण्यात आले.
प्रथम पांडुरंगाच्या आशीर्वाद घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात 500 पेक्षा जास्त भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला. आम्ही दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त या खिचडीचे वाटप करत असतो. यापुढे देखील आम्ही हा भक्तिमय कार्यक्रम असंच चालू ठेवणार असल्याची माहिती आयोजक साई आदमाने यांनी दिली. या कार्यक्रमात महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात स्थानिक नगरसेवक रोहिदास लोखंडे, शिवसेना विधानसभा प्रमुख विजय लिपारे, जगदीश नलावडे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर