मुसळधार पावसाने गंगा-गोदावरी दुथडी भरून वाहू लागली
मुसळधार पावसाने गंगा-गोदावरी दुथडी भरून वाहू लागली
नाशिक -: शहरासह जिल्ह्यात काल उशिरापासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे गंगा-गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याची आवक वाढल्याने रामकुंडसह परिसरातील अनेक घाट पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून १० क्युसेस गोदावरी नदीत सोडण्यात आला आहे, त्यामुळे नदीचा प्रवाह वेगवान झाला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. पोलीस, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांकडून नदी परिसरावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिक, भाविक आणि पर्यटकांना नदीकाठावर जाणे टाळावे, पाण्याखाली गेलेल्या घाटांवर उतरू नये तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तास जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade