महापौर वैद्यकीय मदत निधीसाठी महापौरांना फक्त 25 हजाराचाच अधिकार
महापौर वैद्यकीय मदत निधीसाठी महापौरांना फक्त 25 हजाराचाच अधिकार
मुंबई-मुंबईचे महापौर रितू तावडे यांनी आज मुंबई महानगरपालिका मुख्यालय सीएसटी येथे महापौर वैद्यकीय मदत निधी या कक्षाचे लोकार्पण भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये लेक लाडकी मुख्यमंत्र्यांची, काळजी घेऊ तिच्या आरोग्याची या अभियानांतर्गत मुंबईतील महिलांचे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेद्वारे सन्मान चिन्ह आणि गोल्ड मेडल देऊन महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांना गौरवण्यात आले. महापौर वैद्यकीय सहायता निधी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हे दोन्ही निधी एकाच रुग्णाला कसे मिळणार. त्याचप्रमाणे जर एखाद्या रुग्णाने महापौर वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज केला तर तोच अर्ज मुख्यमंत्री वैद्यकीय साहेब निधीकडे पाठवला जाणार. मग एकाच रुग्णाला दोन ठिकाणाहून कशी मदत मिळणार हा प्रश्न आता हा वाचून उभा आहे. तसेच आजकाल उपचार पद्धती आणि आजार एवढे मोठ्या प्रमाणात बळकावले आहे की 25000 मध्ये कोणत्याही रुग्णालयामध्ये उपचार मिळत नाही त्यासाठी त्याला किमान दोन लाखाच्या वर उपचाराची गरज असते. महापौर वैद्यकीय मदत निधीद्वारे रुग्ण रुग्णालयात दाखल असला पाहिजे. तसेच त्याचे नातेवाईकांनी येऊन या ठिकाणी महापौर वैद्यकीय सहायता निधी मदतीसाठी अर्ज केला पाहिजे त्यानंतर त्या ठिकाणी जी काही प्रोसिजर आहे ती होऊन नंतर रुग्णाला महापौर वैद्यकीय सह्याद्री निधीमधून धनादेश दिला जाईल अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी यावेळेस दिली.
एखादा रुग्णालय महापौर निधी कार्यालयाकडे वैद्यकीय मदतीसाठी जर अर्ज केला तर त्यानंतर महापौर फक्त 25000 पर्यंतच त्यांना मदत करू शकतात परंतु जर रुग्णाला पंचवीस हजार पेक्षा अधिक वैद्यकीय उपचाराची गरज असल्यास त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकडे अर्ज करावा अशी माहिती मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर