देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात
देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात
मुंबई-: ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य उभारलं जाणार आहे. याद्वारे पक्ष्यांच्या हालचाली, स्थलांतर, घरटी बांधण्याची प्रक्रिया आणि त्यांच्या अधिवासावर सतत लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. राज्य सरकारने ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात ४५ कोटी रुपयांच्या इको-नेचर पार्कला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा उद्देश केवळ पर्यटकांना आकर्षित करणे नसून, पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि त्यांच्या हालचालींवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष ठेवणे हा आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या दरम्यान असलेले ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे दरवर्षी हजारो गुलाबी फ्लेमिंगोसह २०० हून अधिक पक्षी प्रजातींचे आश्रयस्थान आहे. भारतात सुमारे १,३०० हून अधिक पक्षी प्रजाती आढळतात.
या अभयारण्यात AI-सक्षम कॅमेरे, ध्वनी टिपणारे सेन्सर्स Acoustic Sensors आणि डेटा विश्लेषण प्रणाली बसवण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे पक्ष्यांचे फोटो, आवाज आणि हालचालींचे विश्लेषण करून विविध प्रजातींची ओळख आपोआप करता येणार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व निरीक्षण पक्ष्यांना कोणताही त्रास न देता केले जाणार आहे.
AI प्रणालीच्या मदतीने पक्ष्यांचे स्थलांतर, घरटी बांधण्याच्या सवयी, प्रजनन आणि वर्तनातील बदल यांची माहिती रिअल-टाइममध्ये मिळणार आहे. एखाद्या भागात पर्यावरणात अचानक बदल झाला, अधिवास धोक्यात आला किंवा बेकायदेशीर हालचाली आढळल्या, तर संबंधित यंत्रणेला तातडीने सूचना मिळू शकतील. त्यामुळे वेळेवर उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर