शेतकरी कर्जमाफी योजनेसाठीची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर….
शेतकरी कर्जमाफी योजनेसाठीची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर….
मुंबई -: “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026” या योजनेसाठी पत्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ५३३ पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी आज अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने सरकारने जाहीर केली असून, बँकांकडून आलेल्या याद्यांची तपासणी या महिन्यात पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात येणार आहेत.
जून महिन्यात शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील एकवेळ समाझोता (OTS) या घटकाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका व इतर खाजगी बँका मिळून एकूण 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती या योजनेकरीता महाआयटीमार्फत विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या सर्व खात्यांची माहिती सहकार विभागातील लेखापरिक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे.
शासन निर्णयात नमूद केलेल्या अपात्रतेच्या निकषात प्रामुख्याने आजी व माजी लोकप्रतिनिधी, सर्व नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सर्व शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी / कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, , सूतगिरण्या, दुधसंघ व बाजार समिती या संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. योजनेप्रमाणे अपात्र असलेल्या या सर्व घटकांची माहिती संबंधित विभागाकडून /संस्थांव्दारे पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
या माहितीचे संगणकीय संस्करण करून योजनेच्या पोर्टलमधून योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितद पवार यांच्या जयंतीनिमित्त आज प्रातिनिधीक स्वरूपात सात जिल्ह्यातील निवडक 533 पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
या यादीतील लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर आधार प्रमाणिकरण करण्याबाबत (SMS) संदेश पाठविण्यात येणार आहे. तसेच सदरच्या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्याचे आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सुमारे 32 हजार आपले सरकार सेवा केंद्रातून पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
याप्रमाणे आधार प्रमाणिकरण करणेपूर्वी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक (Agristack) वरील नोंदणी आवश्यक आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर लाभाची रक्कम DBT व्दारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीत वरील संपूर्ण प्रक्रिया दि. 31.07.2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व व्यापारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade