किटकानाशकांच्या वापराविरोधात फ्रान्सच्या पर्यावरण मंत्र्यांचा राजीनामा
किटकानाशकांच्या वापराविरोधात फ्रान्सच्या पर्यावरण मंत्र्यांचा राजीनामा
पॅरीस-: फ्रान्सच्या पर्यावरण मंत्री मोनिक बारबू यांनी वादग्रस्त कृषी विधेयकाच्या विरोधात भूमिका घेत राजीनामा दिला आहे. या विधेयकात दोन प्रतिबंधित कीटकनाशकांच्या वापरास मंजुरी देण्यात आली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ही कीटकनाशके मधमाशा आणि इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांना हानिकारक आहेत. सरकारने दावा केला की हा कायदा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणला जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांना घटते उत्पन्न आणि शेतीचा वाढता खर्च यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वादग्रस्त विधेयकातील तरतूदी
प्रतिबंधित कीटकनाशके एसेटामिप्रिड आणि फ्लुपायराडीफ्युरॉन यांच्या वापरास तात्पुरती मंजुरी देणे. याचा वापर बीट, सफरचंद आणि चेरीच्या लागवडीत करता येईल.
पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे की यामुळे मधमाशांची संख्या वेगाने कमी होईल, ज्याचा परागीकरणावर परिणाम होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होईल.
पाणी साठवण्याची परवानगी: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठे जलाशय किंवा कृत्रिम तलाव बांधण्याची परवानगी सहज मिळावी.
पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे की हे जलाशय भूजल आणि नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी भरतात. यामुळे उन्हाळ्यात नद्या आणि भूजलाची पातळी कमी होऊ शकते, ज्याचा परिसंस्थेवर परिणाम होईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade