प. महाराष्ट्रातील या देवस्थानात 60 कोटी 75 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड
प. महाराष्ट्रातील या देवस्थानात 60 कोटी 75 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड
कोल्हापूर-: अयोध्येतील राममंदिरातील दान रक्कमेचा उपहार झाल्याची बातमी ताजी असतानाच आता प.महाराष्ट्रातील एका जागृत देवस्थान संस्थानात तब्बल 60 कोटी 75 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असणाऱ्या आदमापूर इथल्या संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र. पण याच सद्गुरु बाळूमामा देवस्थान समितीत तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार 60 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. चौकशी अहवालातून ही बाब समोर आली आहे.
देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुदरगड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संगनमताने कट रचून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली, दस्तऐवजांमध्ये फेरफार करण्यात आला आणि देवस्थानाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन निरीक्षण अधिकारी तथा तत्कालीन कार्याध्यक्ष रागिणी झुंबरलाल खडके, तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह देवस्थानाशी संबंधित इतर विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर