नगरसेवक तेजिंदर सिंगतिवाना यांच्या ‘महापौर Gen Next Civic Fellows’ ठरावास मंजुरी
नगरसेवक तेजिंदर सिंगतिवाना यांच्या ‘महापौर Gen Next Civic Fellows’ ठरावास मंजुरी
मुंबई प्रतिनिधी- : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य तेजिंदरसिंग सतनामसिंग तिवाना यांनी मांडलेल्या ‘महापौर Gen Next Civic Fellows’ योजना सुरू करण्याच्या ठरावास सभागृहाने मंजुरी दिली. या निर्णयामुळे मुंबईतील तरुणांना महानगरपालिकेच्या नागरी प्रशासन, विकासकामे आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
मुंबईतील रस्ते, कचरा व्यवस्थापन, जलभराव, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी समस्यांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकसहभागावर आधारित यंत्रणा उभारण्याची गरज लक्षात घेऊन हा ठराव मांडण्यात आला. शहरातील वाढत्या नागरी तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे सभागृहात नमूद करण्यात आले.
ठरावानुसार, प्रारंभी सहा महिन्यांच्या प्रायोगिक कालावधीत महानगरपालिकेच्या दहा निवडक प्रशासकीय विभागांमध्ये ५० तरुणांची ‘Gen Next Civic Fellows’ म्हणून निवड करण्यात येणार आहे. हे फेलोज रस्त्यांवरील खड्डे, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, पायाभूत सुविधा आणि इतर नागरी सेवांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून भ्रमणध्वनी अनुप्रयोगाच्या (मोबाईल ॲप) माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांकडे नियमित डिजिटल अहवाल सादर करतील.
योजनेअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना महानगरपालिकेकडून आवश्यक प्रशिक्षण, मासिक मानधन आणि यशस्वी प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर ही योजना विस्तारून २०० ‘Gen Next Civic Fellows’ पर्यंत वाढविण्यात येणार असून ती टप्प्याटप्प्याने मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सभागृहाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कृती आराखडा तयार करून निश्चित कालमर्यादेत योजना सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
याबाबत नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांनी सांगितले की, “मुंबईच्या विकासात तरुणांची ऊर्जा, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘महापौर Gen Next Civic Fellows’ ही योजना तरुणांना शहराच्या प्रशासनाशी जोडणारा प्रभावी दुवा ठरेल. यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग अधिक बळकट होईल तसेच मुंबईच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल.”
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर