प्रसुतीगृहांचा दर्जा माता व बाल रुग्णालयांसारखा कराभाजप नगरसेविका प्रिती साटम
प्रसुतीगृहांचा दर्जा माता व बाल रुग्णालयांसारखा कराभाजप नगरसेविका प्रिती साटम
मुंबई-मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रसुतीगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. परंतु या सर्व ठिकाणी केवळ प्रसुतीचीच सुविधा दिली जात असल्याने छोट्या बालकांवर उपचाराची सुविधा मिळत नाही. त्यामुळे महिलांसह छोट्या बालकांवरील उपचारांची सुविधा या एकाच ठिकाणी प्रसुतीगृहांमध्ये मिळावी याकरता महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व प्रसुतिगृहे व बाल चिकित्सा केंद्रे एकाच ठिकाणी निर्माण करुन त्याची दर्जोन्नती करण्यात यावी तसेच, माता व नवजात तथा लहान बालकांसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन ‘माता व बाल रुग्णालय’ अशी आरोग्यविषयक यंत्रणा प्रसुतीगृहांमध्येच कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिका सभागृहात केली आहे. दरम्यान यावर त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी प्रशासनाला दिले आहे.
मुंबई महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी करताना भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी असे नमुद केले की, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील २८प्रसुतिगृहांमध्ये प्रामुख्याने गर्भवती महिलांची प्रसूती सेवा उपलब्ध करुन दिली जाते. मात्र, आजच्या काळात प्रसूती नंतर नवजात बालकांमध्ये जन्मतः आढळून येणारे आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार अशाप्रकारच्या इतर आजारांवर वेळेवर निदान करुन त्यांच्यावर तातडीच्या योग्य उपचाराकरिता तसेच बालरोगतज्ज्ञांची सेवा, नवजात अतिदक्षता विभाग, लसीकरण, पोषण सल्ला आणि माता-बालक आरोग्याच्या सर्वसमावेशक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे.
मात्र, अनेक प्रसुतिगृहांमध्ये प्रसूतीनंतर नवजात बालक आजारी पडल्यास त्याला उपचारार्थ दुसऱ्या लांब पल्ल्याच्या महापालिका रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात हलवावे लागते. त्यामुळे बालकास त्वरित उपचार मिळण्यास विलंब होतो. पर्यायाने, पालकांची आर्थिक, मानसिक व शारीरिक गैरसोयही होते. एकाच छताखाली माता आणि बालकांसाठी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यास त्वरित अधिक परिणामकारक उपचार प्राप्त होऊन सर्वसामान्य नागरिकांसही वेळीच मदत मिळण्यास सुलभ होईल. याकरता, महानगरपालिकेच्या सर्व प्रसुतिगृहांकरिता मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, बालरोग विभाग, नवजात अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या उपचार सुविधा व इतर दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक असून, केवळ या सुविधा प्रसुतिगृहापुरत्याच मर्यादीत न राहता या सर्व प्रसुतिगृहाचे रुपांतर ‘माता व बाल रुग्णालय’ यामध्ये करणे आवश्यक आहे,असे म्हटले अाहे.
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व प्रसुतिगृहे व बाल चिकित्सा केंद्रे एकाच ठिकाणी निर्माण करुन त्याची दर्जोन्नती करणे. तसेच, माता व नवजात तथा लहान बालकांसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन ‘माता व बाल रुग्णालय’ अशी आरोग्यविषयक यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. जेणेकरुन, गरोदर महिलांसह नवजात बालक तसेच छोट्या बालकांच्या आरोग्याबाबतचे सर्व उपचार एकाच छताखाली मिळू शकतील आणि मातांना आपल्या बालकांच्या वैद्यकीय उपचारासाठी इतर ठिकाणी फिरण्याची गरज भासणार नाही ,असेही नमुद केले आहे.
या ठरावाच्या सुचेनवर डॉ शिल्पा सांगारे, जागृती पाटील, स्वप्ना म्हात्रे विशाखा राऊत, शीतल गंभीर किशोरी पेडणेकर, हरिष भांदिर्गे,सभागृह नेते गणेश खणकर आदींनी चर्चेत भाग घेत या ठरावाच्या सूचनेला पाठिंबा देत काही मौलिक सूचना केल्या. यावर महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सदस्यांनी ज्या सूचना केल्या आहेत. आणि जी ठरावाची सूचना मांडली आहे. त्यावर पुढील बैठकीत अभिप्राय सादर करण्यात यावा अशी सूचना केली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर