अखेर जंतर मंतर वरील कॉक्रोच पार्टीचे आंदोलन गुंडाळले
अखेर जंतर मंतर वरील कॉक्रोच पार्टीचे आंदोलन गुंडाळले
नवी दिल्ली-: येथील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोट जनपा पार्टीच्या आंदोलनात उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यानंतर अभिजित दीपकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन चांगलेच विस्कळीत झाले. दीपके यांनी देखील उपोषण करण्याचा प्रयत्न केला मात्र आज पोलीसांनी मोठी कारवाई करत आंदोलकांना हुसकावून लावत आंदोलन मोडीत काढले. आज पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलन अधिक पेटले. रस्त्यावर उतरलेले आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत पोहोचले होते. यादरम्यान पोलिसांकडून दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्यात आले आहे. पोलिसांनी व्यासपीठ मोकळे करून तंबू हटवले आहेत. आंदोलकांना तेथून हुसकावून लावले जात आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जोरदार लाठीचार्जही केला. आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 70 जणांना ताब्यात घेतले असून, धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्यांमध्ये एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही.
दिल्ली पोलीस या हिंसाचारामागील कटाचाही तपास करणार आहेत. पोलिसांच्या मते, हिंसाचाराची पद्धत हा एक पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येते. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, काही पाकिस्तानी हँडल्स जंतर मंतर येथील हिंसाचाराबाबत अफवा पसरवत आहेत, ज्याचा पोलीस तपास करत आहेत.
जंतर मंतर आंदोलन हिंसाचारात पाचहून अधिक आयपीएस (IPS) अधिकारीही जखमी झाले आहेत. एकूण 50 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान जखमी झाले आहेत. यामध्ये आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांसह सुमारे 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस या हिंसाचाराबाबत अनेक गुन्हे दाखल करत आहेत. आज पोलिसांनी विविध ठिकाणांहून अनेक निदर्शक आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले. व्हिडिओ फुटेजच्या आधारे पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवतील अशी दिल्ली पोलिसांच्या सूत्रांची माहिती आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर