उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतकरी चिंतेत; भात लागवड टाळण्याच्या तयारीत
उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतकरी चिंतेत; भात लागवड टाळण्याच्या तयारीत
ठाणे - : उशिरा दाखल झालेला मान्सून, वाढलेली मजुरी, महागलेले बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमती यामुळे ठाणे जिल्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. परिस्थिती अशी आहे की, जिल्ह्यातील सुमारे ५० ते ६० टक्के शेतकरी यंदा भात लागवड न करण्याचा विचार करत आहेत. शेतीचा खर्च सातत्याने वाढत असताना हवामानाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
सुमारे महिनाभर उशिरा आलेल्या मान्सूनमुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले. ज्या शेतकऱ्यांकडे पंप किंवा बोअरवेलची सुविधा होती त्यांनी कशीबशी भाताची रोपे तयार केली, तर काहींनी भाजीपाला लागवडही केली. मात्र त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आता शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे पेरावे लागत असून त्यामुळे शेतीचा खर्च आणखी वाढला आहे. वाढती मजुरी, महागलेले बियाणे आणि खतांच्या किमती यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे जिल्यातील सुमारे ५० ते ६० टक्के शेतकरी यंदा भात शेती न करण्याच्या भूमिकेत आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, एकदा पिकाचे नुकसान झाल्यानंतर पुन्हा गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण झाले आहे. तसेच हवामान विभागाच्या अंदाजांवरील विश्वासही कमी होत चालल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के शेतकरी भात शेतीवर अवलंबून आहेत आणि ही शेती पूर्णपणे पावसावर आधारित आहे. अशा परिस्थितीत कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे.
आता प्रश्न असा आहे की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कोणती ठोस योजना राबवणार, ज्यामुळे त्यांचे नुकसान कमी होईल आणि त्यांना पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.पुणे परिसरात ५० हजार कोटी रुपयांचे महामार्ग प्रकल्प
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर