देशात लवकरच सुरू होणार प्लॅस्टीकच्या चलनी नोटा
देशात लवकरच सुरू होणार प्लॅस्टीकच्या चलनी नोटा
मुंबई-: RBI लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात केवळ १० रुपये आणि २० रुपयांच्या मूल्यांच्या प्लास्टिक नोटा छापल्या जातील. हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच इतर मोठ्या मूल्यांच्या नोटांबद्दल निर्णय घेतला जाईल.
या नवीन प्लास्टिक नोटांमध्ये अत्यंत आधुनिक आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट केली जाणार आहेत. यामुळे बाजारातील बनावट नोटांच्या समस्येला पूर्णपणे आळा बसण्यास मोठी मदत होईल. हे तंत्रज्ञान केवळ सुरक्षेच्या दृष्टीनेच नाही, तर हाताळणीसाठी देखील अतिशय सोयीस्कर असणार आहे.
नवीन प्लास्टिक नोटा बाजारात आल्या तरी जुन्या कागदी नोटा चलनातून बाद केल्या जाणार नाहीत. सध्या बाजारात सुरू असलेल्या सर्व कागदी नोटा पूर्णपणे वैध राहतील आणि व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. प्लास्टिकच्या नोटा केवळ एक सुरक्षित आणि आधुनिक पर्याय म्हणून व्यवस्थेत समाविष्ट केल्या जात आहेत. असे RBI कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडा सारख्या अनेक प्रगत देशांमध्ये आधीपासूनच पॉलिमर नोटांचा वापर यशस्वीरित्या केला जात आहे. पारंपारिक कागदी नोटांच्या तुलनेत या प्लास्टिक नोटांचे आयुष्य अडीच ते तीन पटीने जास्त असते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर