प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत २० प्रकल्प पूर्ण; ४.३० लाख हेक्टर सिंचन.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत २० प्रकल्प पूर्ण; ४.३० लाख हेक्टर सिंचन.
मुंबई-:- राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात येत असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील वीस प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. त्यातून चार लाख तीस हजार हेक्टर सिंचन साध्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आज झालेल्या राज्यातील जलसंपदा प्रकल्प आढावा बैठकीस जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील, जलसंपदा मंत्री (तापी कोकण पाटबंधारे महा विकास महामंडळ) गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे जलविषयक सल्लागार श्रीराम वेदरे , प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव (लाभक्षेत्र विकास) जयंत बोरकर तसेच जलसंपदा विभागाच्या विकास महामंडळाचे सर्व कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प, दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, कोकण उल्हास – वैतरणा व गोदावरी खोरे नदीजोड प्रकल्प यांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात नदी जोड प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना यामधून अनेक प्रकल्प सुरू आहेत. राज्याच्या सिंचन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठे बदल होणार आहे. विभागाने यासंदर्भात पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी. असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
नदीजोड प्रकल्प
वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प सह गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा उपखोऱ्यातील ६३.७४ टीएमसी पाणी बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा उपखोऱ्यात वळविणे प्रस्तावित आहे. प्रकल्पाची सिंचनक्षमता ६,११,१५० हेक्टर असून ते भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशिम या आठ जिल्ह्यात विभागले आहे.
२० प्रकल्प पूर्ण; ४.३० लाख हेक्टर सिंचन
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील योजनेतील २० प्रकल्प पूर्ण झाले असून, ७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. मार्च २०२६ पर्यंत ४.३० लाख हेक्टर, म्हणजेच ७४ टक्के सिंचन क्षमता निर्माण करण्यात यश आले आहे. या मध्ये २९ मोठे व मध्यम सिंचन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत २४ हजार ७२१ कोटी रुपये असून, त्यासाठी ४ हजार २८८ कोटी रुपयांच्या (१७ टक्के) केंद्रीय सहाय्य आहे.या योजनेअंतर्गत ५.७९ लाख हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून याचा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.
केंद्र शासनाने विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील कृषी क्षेत्रातील संकटावर मात करण्यासाठी विशेष पॅकेज अंतर्गत बळीराजा जलसंजीवनी योजना सुरू केली. या योजनेमध्ये ८ मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प तसेच ८३ भूपृष्ठीय लघु सिंचन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे . यावेळी विकसित महाराष्ट्र अंतर्गत जलसंपदा विभागाकडून करण्यात येणारी कार्यवाही बाबत माहिती देण्यात आली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर