महाडमध्ये पावसाची दमदार पुनरागमन; मुसळधार सरींनी दिला दिलासा
महाडमध्ये पावसाची दमदार पुनरागमन; मुसळधार सरींनी दिला दिलासा
महाड-महाड तालुक्यात सलग पाच दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या जोरदार सरींमुळे संपूर्ण परिसरात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होते. भात लागवडीची कामे सुरू असताना पावसाअभावी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आज झालेल्या दमदार पावसामुळे भातशेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महाड शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पावसाची नोंद झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले, तर काही ठिकाणी वाहतूकही संथ गतीने सुरू होती. पावसामुळे तापमानात घट झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस रायगड जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नदी-नाले, ओढे आणि धरण परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसाच्या या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी काही दिवसांतही चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade