शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार विरोधात कोकरोच जनता पार्टीने केले आझाद मैदानात आंदोलन
शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार विरोधात कोकरोच जनता पार्टीने केले आझाद मैदानात आंदोलन
मुंबई-कॉक्रोच जनता पार्टी मुंबईतर्फे आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचं उद्दिष्ट भारतीय शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त परीक्षा व्यवस्था निर्माण व्हावी हे आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांनी सहभाग घेतला होता. सकाळी दहा वाजता या आंदोलनला सुरुवात झाली.
गेल्या काही दिवसांपासून विविध परीक्षा प्रक्रियांची संबंधित गैरप्रकारामुळं शिक्षण व्यवस्थेबाबत देशभरातील विद्यार्थी, पालक आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो युवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच अनुषंगानं गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर इथं सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे. मात्र केंद्र सरकारनं त्यांना अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात आंदोलन स्थळी भेट द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय भीम’, ‘इनक्लाब जिंदाबाद’, ‘दादा भुसे इस्तिफा दो’, ‘धर्मेंद्र कदम इस्तीफा दो’ अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी आझाद मैदानचा परिसर दणाणून सोडला. मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात उत्स्फुर्त सहभागी झाले. या आंदोलनाला गालबोट लागू नये, यासाठी आझाद मैदान परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. पोलीस प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी चार वाजेपर्यंत आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली. पोलीस प्रशासनाला सर्व प्रकारचं सहकार्य आंदोलकांनी केले.
या देशासाठी तरुणांनी बलिदान दिलं आहे. त्यांच्या नखाची बरोबरीही आम्ही करू शकत नाही. त्यांची लढाई ही ब्रिटिशांकडं जात होती. आमची लढाई ही चोरांविरोधात आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मुंबईच्या आंदोलनस्थळी यावं ही आमची मागणी आहे असल्याची माहिती प्रणय अहिरे, कोअर कमिटी सदस्य, सी.जे.पी. यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant