फूटबॉल विश्वचषकातील पराभवामुळे फ्रान्सच्या राजधानीत हिंसाचार
फूटबॉल विश्वचषकातील पराभवामुळे फ्रान्सच्या राजधानीत हिंसाचार
पॅरीस-: फीफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यात फ्रान्सचा संघ स्पेनकडून ०-२ असा पराभूत झाल्यानंतर राजधानी पॅरिसमध्ये हिंसक निदर्शने उसळली. निराश झालेल्या चाहत्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड, दुकानांमध्ये लूटमार आणि जाळपोळ झाल्याच्या घटना नोंदल्या गेल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर केला.
काल टेक्सासमधील एटी अँड टी स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सला स्पेनकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर आता मिकेल ओयार्झाबाल आणि पेद्रो पोरो यांच्या गोलच्या जोरावर फ्रान्सवर 2-0 ने विजय मिळवत स्पेनने दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला. मिकेलने 22 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला, तर पोरोने 58व्या मिनिटाला गोल करून स्पेनची आघाडी दुप्पट केली. फ्रान्सचा कर्णधार किलियन एमबाप्पेने संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली पण तो स्पेनविरुद्ध सामन्यामध्ये विशेष कामगिरी करण्यात अपयशी ठरला. स्पेनच्या संघ एमबाप्पेविरुद्ध चांगली रणनीती करुन आला होता त्यांना त्याचा फायदा झाला.
फ्रान्स विरुद्ध स्पेन यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये स्पेनने विजय मिळवल्यानंतर फ्रान्सच्या चाहत्यांना हा विश्वचषकातील पराभव स्वीकारता आला नाही. सामना झाल्यानंतर पॅरिसमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अर्लिंग्टनमध्ये अंतिम शिट्टी वाजताच फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दंगे उसळले. अनेक भागांमध्ये आगी पसरल्या. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. त्याचबरोबर फ्रान्सचा कर्णधार किलियन एमबाप्पेने संघाचा पराभव झाल्यानंतर त्याच्या देशबांधवांची माफी देखील मागितली आहे.
फ्रान्ससंघ आता 18 जुलै रोजी तिसऱ्या स्थानासाठी मैदानात उतरेल. दुसऱ्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना पराभूत संघाशी होईल, जी अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाईल. तिसरे स्थान मिळवून फ्रान्स आपला सन्मान वाचवण्याचा प्रयत्न करेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये दोनदा फिफा विश्वचषक जिंकला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade