‘खालिद के शिवाजी’ चित्रपट अखेर OTT वर रिलीज
‘खालिद के शिवाजी’ चित्रपट अखेर OTT वर रिलीज
मुंबई -: वादग्रस्त ठरूनही समीक्षकांची प्रशंसा लाभलेला ‘ खालिद के शिवाजी ‘ हा मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. अमेरिकेतील अग्रगण्य मानसिक आरोग्य सेवा संस्था ओमनी हेल्थ केअर सर्व्हिसचे अध्यक्ष असलेले मायकल थेवर यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. LanguageResources
चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांसारख्या उत्कृष्ठ कलाकारांच्या भूमिका असून, खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने अत्यंत अप्रतिम साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून लेखन कैलास वाघमारेचे आहे.
‘आजच्या काळात समाजाला जोडणाऱ्या कथा सांगण्याची गरज आहे. खालिदच्या निरागस नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खरा अर्थ उलगडत जातो’. धर्म, जात आणि सामाजिक भेदांपलीकडे जाऊन माणुसकीच सर्वश्रेष्ठ आहे, हा संदेश हा चित्रपट देतो. हा अनुभव प्रत्येक प्रेक्षकाने घ्यावा’, असे निर्माते मायकल थेवर यांनी सांगितले. हा सिनेमा आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर