शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी काढून टाकण्याची मुख्यमंत्र्यांची घोष
शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी काढून टाकण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई - महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील महत्त्वाच्या अटी काढून टाकण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत करत विरोधकांनी केलेल्या याबाबतच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आज विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी पन्नास हजार रुपयांची रक्कम आता दोन लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय २०२५ पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, मात्र शेतकऱ्याला ताकद देण्यासाठी ही माफी दिली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याशिवाय पंचवीस हजार कोटींची वीजबिल माफी दिली आहे असे त्यांनी सांगितले.
याआधी विरोधकांनी चर्चेत केलेल्या कायदा सुव्यवस्थेतील अनेक मुद्द्यांना त्यांनी उत्तरे दिली . गुन्ह्यांच्या प्रमाणात आपले राज्य देशात सातव्या क्रमांकावर ,तर महिलांविषयक गुन्हे विषयात ९ व्या क्रमांकावर आहे, राज्यात गुन्हे सिद्धीचे प्रमाण ५२.६ टक्के झाले असून २०१२ साली तो ९.४ टक्के होते, हे प्रमाण ७० टक्के हून अधिक गाठण्याचे उद्दिष्ट आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्यासाठी कायद्यात बदल करत आहोत,
आता आपण इ साक्ष नोंदवित आहोत, यामुळे एकदा दिलेली साक्ष बदलणे कठीण होईल असे ते म्हणाले. दोषारोप पत्र वेळेत दाखल करण्याचे प्रमाण पन्नास टक्के आहे , बलात्कार प्रकरणात ते ९० टक्क्यांवर आले आहे. नोंदणी सोपी केल्यामुळे महिलांविषयक गुन्हे अधिक प्रमाणात नोंदविले जात आहेत. बलात्कार प्रकरणात ओळखीचे त्यातही नातेवाईकांचे प्रमाण अधिक आहे, ते ९९ टक्के इतके आहे. या प्रकरणी ९९ टक्के गुन्ह्यात साठ दिवसात दोषारोप पत्र दाखल करण्यात आली असे त्यांनी सांगितले.
महिला बेपत्ता होण्याच्या प्रकरणात २०२१ ते २०२६ या वर्षात ९३ टक्के महिला घरी परतल्या आहेत. यातील अपहरणाचे प्रमाण फक्त ५.५ टक्के इतकेच आहे . ऑपरेशन मुस्कान योजनेत ४३,५५८ बालकांना त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले आहे. गुन्हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयीन लढाईत राज्य सरकार न्यायालयांसोबत एकत्रित काम करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
सायबर गुन्ह्यात पूर्वी ११ टक्के रक्कम गोठवली जात होती, ती आता २७ टक्के इतकी झाली आहे. यातून ४३९ कोटी रुपये वाचवले आहेत. सायबर सेलकडे रोज आठ ते दहा हजार तक्रारी येतात असे सांगत विषारी गावठी दारू प्रकरणी २६ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत
आंतरराष्ट्रीय तस्कर सलीम डोला याला परदेशातून अटक केली, यातून अंमली पदार्थांचे मोठे अड्डे शोधून काढण्यात आले, कोट्यवधींचा माल जप्त केला.
यात सहभाग असणारे २४ पोली निलंबित केले त्यापैकी १८ बडतर्फ करण्यात आले. ठाणे, नागपूर इथे नवीन न्यायालये अमली पदार्थ गुन्ह्यांसाठी स्थापन करण्यात येत आहेत , प्रत्येक विभागात एक अशी न्यायालये उभारली जातील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पोलिसांसाठी ९७६२ निवासाची कामं सुरू आहेत. मुंबईत BDD चाळीत पोलिसांना मालकीची घरे दिली. पुढील आठवड्यात एक समिती स्थापन करण्यात येऊन इतर पोलिसांनाही मालकीची घरे देण्यासाठी त्यांच्याकडून अहवाल घेण्यात येईल. मुंबईत पोलिसांसाठी मोक्याचे ७४ भूखंड शोधून काढले आहेत, त्यात चाळीस हजार घरे उपलब्ध करून देण्यात येतील , त्यात नवीन पोलिस ठाणी देखील उपलब्ध करून देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
अनोळखी मोबाईल क्रमांकावरून काहीही आलेले डाउनलोड करू नये, त्यातून मोठे सायबर गुन्हे होतात असे आवाहन त्यांनी केले. तपास सारथी ही नवीन यंत्रणा उभारली आहे त्यात AI चा वापर करून गुन्हे तपास करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून काम करण्यात येत आहे, नरसापूर घटनेत याचा वापर करण्यात आला होता अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
अजित पवार अपघात प्रकरणी दोन तपास सुरू आहेत, एक CID आणि दुसरा AIIB करत आहे. AIIB तपासानंतर गरज वाटली तर सीबीआय चौकशी करेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्या विमानाच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळले नाही.
विमानाच्या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या आहेत. याबाबत एक अंतरिम अहवाल आला आहे, अंतिम अहवाल पुढील वर्षी जानेवारीत येणे अपेक्षित आहे. हा अहवाल आल्यावर पुढील तपासाची दिशा ठरवता येईल. याबाबत भावना कितीही तीव्र असली तरीही पुरावे मिळायलाच हवेत, या प्रकरणात आम्ही सत्य शोधून काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade