राज्यात मान्सून सक्रिय, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस
राज्यात मान्सून सक्रिय, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस
मुंबई-: जिल्ह्यानिहाय पावसाच्या काल दुपारी ४ वाजेपर्यत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात ३१.७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत सर्वाधिक पाऊस ठाणे (१९६.९ मिमी) जिल्ह्यात नोंदवला गेला; त्यानंतर पालघर (१८५.४ मिमी), रायगड (१३४.१ मिमी), मुंबई उपनगर (१२५ मिमी), पुणे (६९.४ मिमी) आणि मुंबई शहर (६२.१ मिमी) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. GeographicReference
१ जूनपासून आतापर्यंत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक एकूण पावसाची (१,४८०.७ मिमी) नोंद झाली आहे. त्यानंतर पालघर (१,२९५.४ मिमी), रत्नागिरी (१,२७३.४ मिमी), ठाणे (१,१०३ मिमी) आणि सिंधुदुर्ग (१,००१.४ मिमी) या जिल्ह्यांचा क्रम लागतो. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे अनुक्रमे ५१०.७ मिमी आणि ५१२.७ मिमी एकूण पावसाची नोंद झाली आहे.
कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय असल्याचे दिसून येत असून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण चांगले आहे. मुसळधार पावसामुळे, मान्सून महाराष्ट्रात सक्रिय असल्याचे आशादायक चित्र आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant