ट्रम्प यांचे भारताला नरक द्वार म्हणण्यावर घुमजाव
ट्रम्प यांचे भारताला नरक द्वार म्हणण्यावर घुमजाव
वॉशिग्टन डीसी -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बेताल वक्तव्य करण्यात माहीर आहेत. त्यात आज त्यांनी भारताबाबत संतापजनक विधान केले आहे. त्यांनी भारताला आधी नरक म्हटलं होतं. त्यावरून ट्रम्प यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर नेहमी प्रमाणे घुमजाव करत त्यांनी आता ‘ भारत एक महान देश आहे, त्याच्या प्रमुखपदी माझे चांगले मित्र आहेत’ , असे विधान केले आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांचे एक पॉडकास्ट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या पॉडकास्टमध्ये भारत, चीन आणि इतर काही देशांचा उल्लेख ‘नरक’ (Hell-holes) असा करत अत्यंत आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्व कायद्यात बदल करण्याच्या मागणीवरून हा नवा वाद उफाळून आला आहे.
मायकेल सॅव्हेज यांनी आपल्या ‘सॅव्हेज नेशन’ या कार्यक्रमात दावा केला की, भारत आणि चीनमधील लोक केवळ मुलाला जन्म देण्यासाठी अमेरिकेत येतात. अमेरिकेच्या सध्याच्या कायद्यानुसार, तिथे जन्मलेले बाळ तात्काळ अमेरिकन नागरिक बनते. सॅव्हेज यांनी या स्थलांतरितांचा उल्लेख ‘लॅपटॉप घेऊन फिरणारे गँगस्टर’ असा केला असून, त्यांनी अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे. “या लोकांनी माफिया कुटुंबांपेक्षाही जास्त नुकसान अमेरिकेचे केले आहे,” असे अजब तर्क सॅव्हेज यांनी या पत्रात मांडले आहेत.
सॅव्हेज यांनी केवळ देशाचाच अपमान केला नाही, तर भारतीय स्थलांतरितांवरही निशाणा साधला आहे. “कॅलिफोर्नियातील हाय-टेक कंपन्यांमध्ये आता पांढऱ्या व्यक्तीला नोकरी मिळणे अशक्य झाले आहे, कारण तिथली सर्व यंत्रणा आता भारतीय आणि चिनी लोक चालवत आहेत,” असे म्हणत त्यांनी नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून विषारी टीका केली आहे. ट्रम्प यांनी ही वर्णद्वेषी पोस्ट त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने याला अधिकृत पाठबळ मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर