एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी
एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी
मुंबई-: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर ग्रीड सोलर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज निर्मिती करून तीच ऊर्जा वापरण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹१३.०३ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असून, एसटीच्या ऊर्जावापरात मोठी बचत होऊन पर्यावरणपूरक पाऊल उचलले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या बसस्थानके, कार्यशाळा, कार्यालये आणि इतर आस्थापनांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढणार असून, दरवर्षी सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांचा पारंपरिक वीज खर्च वाचणार आहे.
प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नमुना नकाशे, तांत्रिक मान्यता आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
हा उपक्रम हरित ऊर्जा वापराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही बाबींमध्ये सकारात्मक परिणाम अपेक्षित असल्याचे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर