राज्यासह देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस IMD
राज्यासह देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस IMD
पुणे-: गेल्या महिन्यापासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. याच दरम्यान IMD ने एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनचे पहिले दीर्घकालीन पूर्वानुमान जारी करण्यात आले आहे. यंदा दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्के (अधिक/उणे पाच टक्के) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. “2026 मध्ये नैऋत्य मान्सून हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. देशात दीर्घकालीन सरासरीच्या 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच हवामानात बदल झाला तर यापेक्षा 5 टक्क्यांच्या फरकाने कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडू शकतो”, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एम. मोहापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. मे महिन्याच्या अखेरिस दीर्घकालीन मान्सून अंदाजाच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती जारी केली जाणार आहे.
राज्यात सरासरीहून कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेती, पिण्यासाठी लागणारं पाणी, नदी, जलाशय, भुजल पातळी यावर परिणाम होऊ शकतो. ग्रामीण भागात याचे अधिक पडसाद पडू शकतात. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाच्या संशोधनात सरासरीच्या 96 ते 104 टक्के दरम्यान पडणारा पाऊस हा सामान्य पाऊस मानला जातो. तर 90 ते 95 टक्के पावसाचे अंदाज असते तेव्हा तो सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज मानला जातो. तर 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस हा अपुरा पाऊस मानला जातो.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर