IPL मध्ये खेळाडूंची नक्कल करतोय रोबो डॉग
IPL मध्ये खेळाडूंची नक्कल करतोय रोबो डॉग
मुंबई - यंदाच्या IPL सिझनमध्ये मैदानावर सहजपणे वावरणारा रोबो डॉग चंपक विशेष आकर्षणाचा विषय ठरला आहे. राजस्थान रॉयल्सनं IPL 2026 मध्ये आणखी एक विजय मिळवला. त्यांनी ६ विकेट राखून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. त्यामुळे अर्थातच RR फॅन्स सध्या खुश आहेत. यातच एक अजब घटना घडली. रोबो डॉग चक्क राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंची नक्कल करू लागला.हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. संदीप शर्मा मॅच सुरू होण्यापूर्वी व्यायाम करत होता. त्यावेळी चंपक रोबो त्याच्या जवळ गेला आणि नक्कल करत व्यायामाचे प्रकार करू लागला. हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ @aayushgarg01 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून, नेटकरी एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. IPL मध्ये गेल्या एक-दोन वर्षांपासून रोबो डॉग्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. हा रोबोटिक कुत्रा प्रोडक्शन टीमचा एक भाग आहे. या कुत्र्याच्या पाठीवर एक कॅमेरा असतो. या कॅमेऱ्याच्या मदतीने मॅचमधील महत्त्वाचे क्षण टिपण्यास मदत मिळते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant