10 हजारांवरील UPI पेमेंटवर लागेल एक तासाचा ‘ब्रेक’
10 हजारांवरील UPI पेमेंटवर लागेल एक तासाचा ‘ब्रेक’
मुंबई-RBI ने ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आता महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांना ५ सूत्री सुरक्षा योजना मांडली आहे. RBI नवीन सुरक्षा उपाययोजना लागू करण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित नियमांनुसार, 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे ऑनलाइन व्यवहार तात्काळ पूर्ण करण्याऐवजी एका तासापर्यंत थांबवले जाऊ शकतात. या वेळेत ग्राहक इच्छित असल्यास व्यवहार रद्द देखील करू शकतात.RBI ने या प्रस्तावांवर ८ मे २०२६ पर्यंत जनतेकडून अभिप्राय मागवले आहेत. त्यानंतर लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाऊ शकतात.
RBI च्या नवीनतम परिपत्रकानुसार, 10,000 पेक्षा जास्त रकमेच्या अकाउंट-टू-अकाउंट हस्तांतरणावर एक तासाचा कूलिंग पीरियड लागू केला जाऊ शकतो. या वेळेत रक्कम तात्पुरती खात्यातून वजा केली जाईल. परंतु ग्राहक इच्छित असल्यास निर्धारित वेळेत व्यवहार रद्द करू शकतात. एखाद्या व्यवहारात फसवणुकीचा संशय आल्यास बँक ग्राहकाशी पुन्हा खात्री केल्यानंतरच पेमेंटची प्रक्रिया पुढे करेल.
प्रस्तावित ५ मास्टर प्लॅन्स
१) किल स्विच – एका क्लिकने सर्व डिजिटल पेमेंट पद्धती बंद.
२) प्रतीक्षा कालावधी – १०,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी १ तास थांबवला जाईल.
३) विश्वसनीय व्यक्ती – ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणी.
४) शॅडो क्रेडिट – अचानक मोठी रक्कम आल्यास योग्य स्रोत दिल्याशिवाय पैसे वापरता येणार नाहीत.
५) अतिरिक्त सुरक्षा – मोठ्या व्यवहारांसाठी बायोमेट्रिक्स, पिन किंवा टोकन आवश्यक.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर