महादेव पालव मार्गावरील वाहतूक प्रश्न लवकरच मार्गी – शिवसेना पुढाकार
मुंबई : करीरोड येथील महादेव पालव मार्गावरील वाहतूक समस्येबाबत स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत आज प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. शिवसेना शिवडी विधानसभा संघटन प्रमुख तथा माजी आमदार श्री. दगडू (दादा) सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलिस उपायुक्त (ट्रॅफिक) श्री. प्रशांत परदेशी यांनी संबंधित ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी परिसरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची अडचण तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. स्थानिकांच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरच ठोस उपाययोजना करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात विधानसभा प्रमुख शशिकांत निकम, शिवडी विधानसभा समन्वयक कुणाल प्रभुणे, शिवसेना शाखाप्रमुख, विविध पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिकांच्या प्रश्नांसाठी शिवसेना सदैव तत्पर असून, नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant