गोसेविकांवरील कारवाई थांबवा, मच्छिंद्र भोसले यांची मागणी
गोसेविकांवरील कारवाई थांबवा, मच्छिंद्र भोसले यांची मागणी
मुंबई-मुंबईतील गोसेविकांवर होणाऱ्या कारवाया त्वरित थांबवा आणि गोसावीकांना न्याय मिळवून द्या अशी मागणी भटक्या व विमुक्त जाती संघाचे मुंबई अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले मुंबई शहरात प्रत्येक मंदिरासमोर पूजेसाठी गाई असतात, देवतेची पूजा करून प्रत्येक गाईन्त गवताचा चारा भक्त जण अर्पण करीत असतात. नाथपंथी डवरी, गोसावी समाजाच्या गोसेविका माता-भागर्न पुरातन काळापासून धार्मिक गाईची पूजा करण्या-साठी भक्तांना तेथे गाय उपलब्ध करतात. या माताभगिनीना भक्ताकडून दान दिले जाते. त्यावर त्यांची रोजी रोटी चालते. गेल्या मे महिलापासून मलबार हील, नाना चौक ग्रँट रोड, चिशबाजार गांवदेनी पोलीस ठाणे परिसर व्ही टी एल.टी मार्ग कुलाबा उबई सेंट्रल, या परिसरातील धार्मिक गाईंना पोलिस प्रशासनाने सदरील मंदिर परिसरातील गाईवर बंदी आणल्याने सुमारे शंभर गाईवर कारवाई करुन, १२५० रुपयाचा दंड ठोकून या गोमाता फोनवर टाकण्याची कारवाई केल्याने शेकडो माता-भगिनींना उपासमार्ग सामोरे जावे लागत आहे. कंपनी मुंबई परिसरात अशा सुमारे 5000 गोमाता असून त्यातील प्रभाग क्रमांक एक दोन तीन आणि आठ या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. ही कारवाई पोलीस स्टेशन करीत असून महापालिका या प्रकरणी कोणताही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. हिंदू धर्मात आणि भारतात व मातेला पवित्र मानून पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये 84 कोटी देवतांचा वास गायीच्या उदरात असतो असे सांगितले जाते परंतु तरीदेखील मोठ्या प्रमाणात या गोमाता सेविकांवर कारवाई केली जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे. अशी माहिती भटक्या विमुक्त जाती संघाचे मुंबई अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर