क्रिकेट स्पर्धेतून अनोखा उपक्रम; ४६१ रक्तदात्यांचे भव्य शिबीर, १३८३ रुग्णांना मिळणार जीवनदान
क्रिकेट स्पर्धेतून अनोखा उपक्रम; ४६१ रक्तदात्यांचे भव्य शिबीर, १३८३ रुग्णांना मिळणार जीवनदान
मुंबई - शिवडी येथील साईराज मित्र मंडळ यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत तब्बल 461 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून, त्यातून अंदाजे 1383 गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. शिवडीतील साईराज मित्र मंडळाने सलग 6व्या वर्षी यशस्वीरीत्या राबविला हा अनोखा उपक्रम राबविला आहे.
शिवडी येथील साईराज मित्र मंडळाने क्रिकेटच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा अनोखा उपक्रम रविवार,22 मार्च 2026 रोजी पार पाडला. या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे साईराज मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी एप्रिल महिन्यात भव्यदिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते,मोफत प्रवेश असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत संघांना सहभाग मिळविण्याकरिता त्यांनी केलेल्या रक्तदानाच्या संख्येनुसार स्पर्धेत प्रवेश दिला जातो. ज्यामध्ये सहभाग मिळविण्याकरिता प्रतिसंघ किमान 15 जणांनी रक्तदान करणे बंधनकारक असते. शिवडीतील सर्वच क्रिकेट खेळणारी मंडळे उस्फुर्तपणे सहभागी होऊन या रक्तदान शिबिरात रक्तदान करतात. यंदा या उपक्रमास क्रिकेटप्रेमी तरुण तर हौशेने सहभागी झालेच परंतू शिवडी-काळाचौकी विभागातील तरुण,महिला ज्येष्ठ नागरिकही मोठ्या आवडीने सहभागी होऊन त्यांनी रक्तदान केले. साईराज मित्र मंडळ गेली 6 वर्ष हा अनोखा उपक्रम राबवित आहे. रविवार,22 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात 461 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमास कॅनरा बँक,पुनीत बालन ग्रुप,भारत पेट्रोलियम,बँक ऑफ इंडिया,महावीर इंटरनॅशनल यांनी मोलाचे सहकार्य केले. व केईएम रुग्णालय रक्तपेढी,जे जे महानगर रक्तपेढी आणि मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तसंकलन केले. मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे साईराज मित्र मंडळाने आभार मानले.या उपक्रमास शिवसेना सचिव सुधीर साळवी,विभागीय आमदार अजय चौधरी,नगरसेवक सचिन पडवळ,नगरसेविका सुप्रिया दळवी,युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव तसेच शिवसेना-युवासेना पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant