प्रफुल पटेल, सुनील तटकरेंच्या पत्रावर सुनेत्रा पवार नाराज
प्रफुल पटेल, सुनील तटकरेंच्या पत्रावर सुनेत्रा पवार नाराज
मुंबई : प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं ते पत्र झी 24 तासच्या हाती लागलंय.. या पत्रात पक्षाच्या अध्यक्षांसारखे अधिकार कार्याध्यक्षांना असतील असं नमूद केल्याचं पाहायला मिळतंय.. पटेल, तटकरेंच्या याच पत्रावर सुनेत्रा पवार नाराज झाल्या. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं.. पटेल, तटकरेंचं पत्र ग्राह्य धरू नये अशी मागणी सुनेत्रा पवारांनी आयोगाला केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे यांना हटविण्यात आले किंवा कसे, या प्रश्नामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे वादळ सुरू झाले असून, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दहा मार्च रोजी दिलेल्या पत्रात त्या स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष व शिवाजीराव गर्जे खजिनदार ही दोनच पदे पेनाने नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे पटेल व तटकरे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, यातून पक्षात नवी फूट पडते की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सुनेत्रा पवार यांनी २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्याविषयीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यासाठी सादर केलेल्या पत्रात पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे त्यांचे पदच लिहिलेले नसल्याने या दाव्याला बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. दहा मार्च रोजी आयोगाला सादर केलेल्या पत्रात सुनेत्रा पवार या अध्यक्ष, तर शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष म्हणून नमूद आहे. पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे पदच लिहिण्यात आलेले नाही. याच पत्रात पवार यांनी २८ जानेवारीनंतर त्यांनी दिलेल्या पत्रापर्यंत करण्यात आलेला कुठलाही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असेही अधोरेखित केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade