व्यावसायिक सिलिंडर ₹218 ने महागला
व्यावसायिक सिलिंडर ₹218 ने महागला
मुंबई - देशातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर ₹218 पर्यंत महाग केला आहे. चेन्नईमध्ये तो सर्वात महाग 2246.50 रुपयांना मिळेल. दिल्लीत त्याची किंमत ₹2078.50 झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने रेस्टॉरंट मालकांचा खर्च वाढेल. अशा परिस्थितीत ते चहा, नाश्ता आणि थाळी महाग करू शकतात. लग्नांची कॅटरिंगही महाग होऊ शकते. इराण-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटामुळे ही दरवाढ करण्यात आली असून, यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर आहेत.
नवी मुंबईतील रेस्टॉरंट चालक सुभाष देशमुख म्हणाले की, चाकरमान्यांना रोज वडापाव, पोहे, उपमा, ब्रेडपॅटीस इत्यांदी नाष्ट्याची सोय केली जाते. परंतू त्यासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने आम्हाला नाईलाजाने आमच्या सेवेच्या किंमती वाढवाव्या लागतील. परिणामी सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी रोजचा नाष्टा काहीसा महाग होऊ शकतो.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली असली, तरी घरगुती (Domestic) १४.२ किलो सिलिंडरच्या दरात सध्या कोणतीही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत घरगुती सिलिंडरचा दर ९१२.५० रुपयांवर स्थिर आहे. मात्र, व्यावसायिक गॅस महागल्याने छोट्या हॉटेल व्यावसायिकांचे बजेट कोलमडणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant